Featured post

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी , https://m.facebook.com/groups/854222064638490?view=group या समुहावर दररोज शैक्षण...

Sunday 19 December 2021

3 जानेवारी कविता

 सावित्री .......

मला तुझा फ़ार अभिमान वाटला आहे नेहमीच!

लहानपणी पुस्तकात तुझं चित्र पाहिलं,

आणि ते मनात खोलवर रुतत गेलं.

तू ताठ मानेनं शाळेकडे चालली होतीस......

काही लोकं आडोश्याला कुजबुज करीत होती ......

एका पडक्या भिंतीआड काही लोकं,

लपून डाव मांडून बसली होती ......

शेणाचे गोळे होते त्यांच्या हातात!!!!!!


मला बाईंनी सांगितले की 

तू कुणाला घाबरली नाहीस 

तू तुझं काम करीत राहिलीस!!!!!


सावित्री .......

तू ........

आणि तुझं चित्र काढणारा तो चित्रकार ......

तुझ्या जीवनीतून तो प्रसंग पुस्तकात लिहिणारा तो लेखक ......

आणि तो प्रसंग रंगवणाऱ्या माझ्या बाई ........

ह्या सर्वांची मी ऋणी आहे!


हातात पुस्तक घेऊन चालत जाणारी तू !!!

कधी माझ्यात शिरलीस माहित नाही,

मी काही सावित्री होऊ शकत नाही!

मी शेणगोळे पण झेलू शकत नाही 

एका साडीवर आयुष्य ही घालवू शकत नाही 

पण मी माझ्यातली मी शोधून काढली आहे 

कारण तूच मला शिकवलंस 

चालत रहा 

निःस्वार्थ 

निःपक्ष 

अटळ .....


आरती ठाकूर



💥 *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ३ जानेवारी 'महिला शिक्षण दिन' म्हणून होणार साजरा.* 

कोणत्या इयत्तेस / गटास कोणते उपक्रम आहेत ते पहा.


*https://www.shaleyshikshan.in/2020/12/mahila-shikshan-din.html*


🎯 *विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार...*


📌 इयत्ता १ ली ते ५ वी

*भाषण - क्रांतीज्योती सावित्रीबाई*

वेळ - ३ मिनिटे


📌 इयत्ता ६ वी ते ८ वी

*निबंध लेखन - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले*

शब्द मर्यादा - ३०० ते ३५० शब्द


📌 इयत्ता ९ वी ते १० वी

*वक्तृत्व - स्त्री शिक्षणाचे महत्व व सावित्रीबाई फुले*

वेळ - ५ मिनिटे


📌 इयत्ता ११ वी ते १२ वी

*परिसंवाद / एकांकिका -  मी सावित्री बोलतेय*

वेळ - ५ मिनिटे


*वरील सर्व साहित्य/व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर करावयाचे आहेत.*

*https://bit.ly/3nX9H1U* 


*शेअर करा.*


No comments:

Post a Comment