Featured post

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी , https://m.facebook.com/groups/854222064638490?view=group या समुहावर दररोज शैक्षण...

Thursday 17 August 2017

*डेटा एन्ट्रीसाठी तंत्रस्नेही* *शिक्षकांची नियुक्ती करा* *शिक्षण विभागाने दिल्या* *सूचना: सरल चे काम करण्यासाठी प्रत्येकाला टार्गेट*

पुणे - राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांची सर्व माहिती, सर्व शाळांची माहिती, सर्व शिक्षकांची माहिती एकाच पोर्टलवर आणण्याचे काम सरल या प्रणालीच्या माध्यमातून सुरु असून हे काम करताना डेटा एन्ट्री करण्यासाठी प्रत्येक उपसंचालकांनी एका तंत्रस्नेही शिक्षकाची निवड करावी अशा सूचना चक्क शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना तंत्रस्नेही व्हा असे आवाहन करण्यामागे शिक्षण विभागाला हे काम करवून घ्यायचे होते का, असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सरलमध्ये माहिती भरण्यासाठी प्रत्येकाला डेडलाईन दिली असून त्यानुसार काम पूर्ण न केल्यास शिक्षकांचा ऑक्टोबर माहिन्याचा पगार दिला जाणार नसल्याचे सांगितले आहे.
काहीच दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान शिकवले जावे, शिक्षकांनी आपल्या कल्पकता, विचार, अध्यापन कौशल्याची देवाण घेवाण करावी यासाठी शिक्षण विभगाने तंत्रस्नेही शिक्षक उपक्रमाची घोषणा केली होती. अधिकाधिक शिक्षकांनी व्हॉट्स ऍप, यु ट्यूब, वेबसाईट अशा समाजमाध्यमांचा वापर करावा यासाठी शिक्षण विभागाकडून प्रवृत्त केले जात होते. शालेय विभागाने यासाठी अशा तंत्रस्नेही शिक्षकांची यादीच तयार केली आहे. यामध्ये राज्यभरातील शेकडो शिक्षकांनी नोंदणी केली आहे. मात्र आता शिक्षण विभागाकडून तंत्रस्नेही शिक्षकांचा वापर स्वत:ची कामे करुन घेण्यासाठी होतो आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिक्षण विभागाच्या 16 ऑगस्ट रोजी काढलेल्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे, विभागीय शिक्षण उपसंचालकांनी आपल्या अखत्यारितील एका तंत्रस्नेही शिक्षकांची नियुक्ती या कार्यास मदत करण्यासाठी पुढील तीन महिन्यांकरिता करावी असे नमूद केले आहे. त्याचबरोबर तालुकास्तरावरील कामांसाठीही दोन ते तीन तंत्रस्नेही शिक्षक मदतीला घ्यावे, शालेय पोषण आहारासाठीही आवश्यकतेप्रमाणे तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्यावी असे नमूद करण्यात आले आहे.
चौकट
- सर्व विद्यार्थी आधारशी लिंक केल्याशिवाय संच मान्यता नाही
- संच मान्यता न झाल्यास शिक्षकांचा ऑक्टोबरचा पगार नाही
- इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे वरच्या वर्गात प्रमोशन ऑनलाईन होणार
- इयत्ता नववीतही नापास ऐवजी पात्र किंवा अपात्रचा शेरा
- दहावी बारावीच्या पात्र विद्यार्थ्यांची माहिती आता सरलमधूनच मिळणार
- शिष्यवृत्तीसाठीही विद्यार्थ्यांची माहिती सिस्टिमध्येच मिळणार
- विद्यार्थ्यांची माहिती 30 सप्टेंबरपूर्वी भरणे बंधनकारक
- ऑफलाईन माहिती मागविणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई.

No comments:

Post a Comment